PM Modi in Pune । पुणे : उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या दरम्यान, त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडत असल्याने हे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतुकीत (Pune transport) महत्त्वाचे बदल केले आहेत. याबाबत पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे. सकाळी ६ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात आवश्यकतेप्रमाणे पुणे विद्यापीठ चौक, सिमला ऑफिस चौक, सेवासदन चौक, अलका चौक, संचेती चौक, स. गो. बर्वे चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, टिळक रोड, जेधे चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, संगमवाडी रोड, गोल्फ क्लब चौक, सादलबाबा चौक, विमानतळ रोड या ठिकाणांवरील वाहतूकीत बदल केले जाणार आहेत. (Pune City Traffic)
Sharad Pawar । … तर राज्यात सत्तांतर होईल; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक व्यवस्थेत बदल केले जाणार आहे. तसेच शहरातील वाहनचालकांनी त्यांची गैरसोय होवू नये यासाठी या मार्गांचा वापर टाळून इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन देखील वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.