Nasim Khan । मुंबई काँग्रेसचे नेते मोहम्मद आरीफ ऊर्फ नसीम खान यांनी आपल्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. ते आता उरलेल्या लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यांसाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार नाहीत. नसीम खान यांनी आपला राजीनामा पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्याकडं सोपवला आहे. अशातच आता नसीम खान यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. (Latest marathi news)
Sharad Pawar । “शिवसेनेत शरद पवारांनी चार वेळा फूट पाडली,” ‘या’ नेत्याची जहरी टीका
नसीम खान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “पक्षात (Congress) एक दलाल नेता असून तो इतर पक्षांशी हातमिळवणी करत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक लोकांनी, अल्पसंख्याक समाजाच्या अनेक संघटनांनी मला फोन करून रोष व्यक्त केला असून पक्षाने राज्यात एकाही अल्पसंख्याकाला उमेदवारी दिली नाही. याचं कारण काय? काँग्रेसची अशी काय मजबुरी आहे? असा प्रश्नच मला या लोकांनी उपस्थित केला आहे,” असं नसीम खान म्हणाले आहेत.
Bus Accident । काळ आला पण वेळ नाही! १०० फूट दरीत कोसळली बस, २८ प्रवासी जखमी
दरम्यान, नसीम खान हे मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण त्यांना पक्षानं संधी दिली नाही. विशेष म्हणजे नसीम खान हे चारदा राज्यात मंत्री आणि आमदार राहिले आहेत. “पक्षानं राज्यात एकही मुस्लिम उमेदवार न देण्याचा अयोग्य निर्णय घेतल्यानं मी अस्वस्थ झालो आहे. म्हणून मी माझ्या स्टार प्रचारकपदाचा राजीनामा देत आहे,” अशी प्रतिक्रिया नसीम खान यांनी दिली आहे.