Nashik Accident । 18 प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली; अनेकजण जखमी

Accident News Bus

Nashik Accident । मागच्या काही दिवसापासून नाशिकमधून अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये बस अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. मागच्या काही दिवसापूर्वीच बसला मोठी आग लागून भीषण अपघात झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात (Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik Accident News)

Maratha Reservation । “…तर मराठा आरक्षण टिकणार नाही”, जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?

माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड जवळ मुंबई आग्रा महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये जवळपास 14 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची देखील माहिती मिळत आहे. 18 प्रवाशांना घेऊन बस मध्यप्रदेशातून मुंबईकडे जात होती. पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे समोरचं काही दिसत नव्हतं. यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला आहे.

Rashmika Mandanna । डिपफेक व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या अटक होताच रश्मिकाने दिली प्रतिक्रिया

या अपघाताची माहिती मिळताच त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बाहेर काढले. अपघातात जे प्रवासी जखमी झाले त्यांना तातडीने रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Amruta Fadnavis । अमृता फडणवीसांनी महिलांना दिला मोठा सल्ला; म्हणाल्या, “मी सकाळी लवकर उठून…”

Spread the love