
Nashik Bus Fire । सध्या नाशिक (Nashik News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये एका धावत्या शिवशाही बसने अचानक पेट घेतल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. या बसमधून तब्बल 25 प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस ने पेट घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला. यानंतर प्रवासी खाली उतरताच काही मिनिटातच संपूर्ण बसने पेट घेतला आणि काही क्षणातच बस संपूर्ण जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली असली असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. नाशिक -छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निफाडच्या चितेगाव फाटा या ठिकाणी ही घटना घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Nashik Shivshahi Bus Fire)
बसला आग लागल्याची माहिती समजताच चालक व वाहक यांनी प्रसंगावधान राखत बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवलं. यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. बसला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
Actor Vidyut Jamwal nude photos । अभिनेता विद्युत जामवालचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल