Nashik Crime । दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. पोलिसांनी कितीही कडक कारवाई केली तरी देखील गुन्हेगारीचे प्रमाण काही कमी होत नाही. अनेक मोठं मोठे गुन्हे हे घडतच आहेत. सध्या देखील नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक शहरात भरवस्तीत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Gadchiroli News । मोठी बातमी! पोलिसांना मोठे यश, दोन महिलांसह तीन नक्षलवाद्यांना अटक
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक शहरात भरवस्तीत टोळक्यानं तलवारी नाचवत परिसरात गोळीबार केला. टोळीयुद्धातून गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अधिकचा तपास देखील सुरु केला आहे. दोन सराईत गुन्हेगारांच्या वादानंतर रस्त्यातच टोळीयुद्ध भडकलं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये टोळीयुद्धातून फायरिंगची घटना घडली आहे. भरवस्तीत तलवारी नाचवत टोळक्यानं गोळीबार केला आहे. pic.twitter.com/FX6OyFwg2J
— News18Lokmat (@News18lokmat) April 8, 2024
Raj Thackeray । एकीकडे युतीची चर्चा तर दुसरीकडे भाजपने राज ठाकरेंना दिला सर्वात मोठा धक्का
ही धक्कादायक घटना सिडकोमध्ये असलेल्या त्रिमूर्ती चौक परिसरात घडली आहे. तलावारी नाचवत टोळक्याकडून भरवस्तीत गोळीबार करण्यात आला. या प्रकारामुळे तेथील परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. न्यूज १८ मराठीने याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.
Ajit Pawar । अजित पवार गटाच्या नेत्याने केला सर्वात मोठा गौप्यस्फोट