
Nashik Crime News । 31 डिसेंबरच्या रात्री सगळीकडे आपल्याला जल्लोष पाहायला मिळतो. अनेक जण हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या. करतात तर काहीजण घरी देखील पार्ट्या करता. एकीकडे थर्टी फर्स्टच्या रात्री सर्वत्र जल्लोष साजरा करत असताना दुसरीकडे मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर अत्यंत थरारक घटना घडली आहे. मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर एका खाजगी वाहनावर कोयता आणि चोपरणे हल्ला करत दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
रात्रीची वेळ साधून दरोडेखोर नेहमीच दरोडा टाकतात. असंच काहीसं 31 डिसेंबरच्या रात्री मुंबई नाशिक महामार्गावर मुंडेगाव शिवारात घडलं. मुंडेगाव शिवारामध्ये तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनांवर कोयता आणि चोपरने हल्ला केला आणि जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज दरोडेखोरांनी लुटल्याची माहिती मिळत आहे.
Manoj Jarange । मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांसमोर संतापले, नेमकं काय घडलं बैठकीत?
31 डिसेंबरच्या रात्री तीन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. या खाजगी वाहनांमध्ये पाच प्रवासी प्रवास करत होते.
दरोडेखोरांनी हल्ला करताच यातील प्रवाशांनी पळ काढत आपला जीव वाचवला यानंतर प्रवाशांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून यासंदर्भात पोलीस यंत्रणा तपास करत आहे. त्याचबरोबर तीन संशयी ताणविरुद्ध पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे.