
Nashik News । नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली असली तरी याचा वापर आपल्याला सर्रासपणे पाहायला मिळत आहे. नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नायलॉन मांजाने गळा कापल्याने किंवा इतर काही इजा होऊन अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे. आपण अशा अनेक घटना ऐकल्या असतील. मागच्या काही दिवसापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याचा मांज्यामुळे गळा चिरल्याने मृत्यू झाला होता. आता सध्या देखील नायलॉन मांजाने गळा कापल्यामुळे सात वर्षाच्या मुलाला 40 टाके पडल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात व शहरात मांजाचा वापर जास्त सुरू असल्यामुळे कटलेल्या पतंगीचा मांजा गळ्यात अडकल्याने एका सातवर्षाच्या चिमुकल्याला तब्बल 40 टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. मुलगा आपल्या आजोबांसोबत रस्त्याने येत असताना काटलेल्या पतंगीचा मांजा मोटरसायकलवर अडकून त्याच्या गळ्यात अडकला. यामध्ये मुलाला गंभीर दुखापत झाली आणि त्याला तातडीने दवाखान्यामध्ये नेण्यात आले.
मानेपासून गळ्यापर्यंत मुलाला जवळपास 40 टाके पडले आहेत. जखम खूप खोलवर गेल्याने त्या मुलाचा जीव जाऊ शकला असता मात्र त्याला वेळीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याने त्याचा जीव वाचला आहे. मात्र त्याची परिस्थिती गंभीर असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
Navi Mumbai । धक्कादायक प्रकार! ट्रक चालकाने पोलिसांना दगडाने आणि बांबूने केली जबर मारहाण