Nashik News । सध्या नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी अनैतिक संबंधातून एका माजी सैनिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. यामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी (१० मार्च) रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली. (Nashik Breaking News)
Rohit Pawar । रोहित पवार यांचा भर पत्रकार परिषदेत सर्वात मोठा गौप्यस्फोट!
अमोल काठे असं मृत माजी सैनिकाचं नाव आहे. या गोळीबाराच्या घटनेमध्ये अमोल काठे यांचा भाऊ कुंदन देखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपीच्या पत्नीसोबत माजी सैनिकाचे अनैतिक संबंध असल्यामुळे हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. अमोलमुळे आपला संसार मोडल्याचा राग आरोपीच्या मनात होता आणि याच रागातून आरोपीने गोळीबार केला आहे.
रागामध्ये आरोपी बंदूक घेऊन अमोलच्या घरी पोहचला यावेळी दोघांमध्ये बाचाबाची देखील झाली. यावेळी अमोलच्या भावाने त्यांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी आरोपीने मधस्थी करण्यासाठी आलेल्या अमोलचा भाऊ कुंदन याला देखील मारहाण केली. या मारहाणीत कुंदन गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Politics News । राजकीय वर्तुळात मोठा भूकंप! काँग्रेसच्या ३२ नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश