Nashik News । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. भुजबळ कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ (Sameer Bhujbal and Pankaj Bhujbal) यांना बँकेने नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कर्ज थकवल्याप्रकरणी बँकेने ही नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे आयोध्येला न जाता जाणार ‘या’ ठिकाणी; घेतला सर्वात मोठा निर्णय
नाशिक जिल्हा बँकेने माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस पाठवली आहे. 51 कोटी 66 लाख थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून ही नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी या ठिकाणी जाऊन स्ट्रोकच्या गेटवर नोटीस चिकटवली आहे.
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे आयोध्येला न जाता जाणार ‘या’ ठिकाणी; घेतला सर्वात मोठा निर्णय
बँकेची आर्थिक परिस्थिती ढासाळल्याने थकीत कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कडक पावले उचलली असून बँकेने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर जाऊन ही नोटीस चिकटवली आहे. कारखान्याचे संचालक असलेले पंकज भुजबळ समीर भुजबळ यांच्यासह सत्येन आप्पा केसरकर यांना देखील नोटीस बजावण्यात आली आहे. तीन वर्षापासून बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे बँकेने थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केली असल्याचे सांगण्यात आले आहे.