Site icon e लोकहित | Marathi News

नाशिकची हिंद केसरी थाळी राज्यात प्रसिद्ध; आस्वाद घेण्यासाठी होते खवय्यांची गर्दी

Nashik's Hind Kesari Thali is famous in the state; There was a crowd of gourmands to taste it

जेवणाच्या थाळींना नवनवीन आकर्षक नावे देणे हा प्रकार आजकाल वाढत चालला आहे. मध्यंतरी सोलापूरमधील एका हॉटेल चालकाने तर चक्क गौतमी थाळी सुरू केली होती. आता खवय्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकमध्ये (Nashik) सध्या ‘हिंद केसरी’ थाळीची जास्त चर्चा आहे. ही झणझणीत नॉनव्हेज थाळी खाण्यासाठी राज्यभरातील खवय्ये नाशिकला भेट देत आहेत. घरगुती मसल्यातून बनवलेले नॉनव्हेज ही या थाळीची खासियत आहे.

“…म्हणून अमित शाहांनी कसबा चिंचवड मध्ये प्रचार केला नाही; रोहित पवारांचे ‘ते’ ट्विट चर्चेत

नाशिक मधील ज्योती पालवे यांनी ही थाळी सुरू केली आहे. यामध्ये हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी आणि नाशिक केसरी असे विविध प्रकार आहेत. एका हिंद केसरी थाळीमध्ये जवळपास आठ ते दहा जणांचे कुटुंब पूर्ण जेवण करू शकते. या थाळीमध्ये सुक्के मटण, रस्सा मटण, मटण खिम्मा, कोलंबी रस्सा, रस्सा चिकन, सुक्के चिकन, चिकन खिमा, पापलेट फ्राय, सुरमई फ्राय, कोलंबी फ्राय, कोल्हापुरी तांबडा रस्सा, कोल्हापुरी पांढरा रस्सा, सोलकढी, चिकन खिमा खिचडा, मटण खिमा खिचडा, कोलंबी खिचडा, झिंगा चटणी, चपाती, बाजरीची भाकरी, इंद्रायणी राईस मिळतो. या थाळीची किंमत 7000 रूपये इतकी आहे.

शिवजन्मोत्सव: ‘परी’चा नववारी भरजरी अंदाज, मायरा वायकुळचे लेटेस्ट फोटो पाहिले का?

ज्योती पालवे यांनी आपले पती निखिल पालवे यांच्यासोबत चर्चा करून, इतरांपेक्षा हटके देण्याच्या निश्चयातून नॉनव्हेज हॉटेल ( Non veg Hotel) सुरू केले. यामध्ये हिंदकेसरी ( Hind kesari) थाळी सुरु केली. यासोबतच सहा ते सात जण जेवण करू शकतील अशी भारत केसरी थाळी ( किं. 5500 रुपये) , चार ते पाच जणांसाठी महाराष्ट्र केसरी थाळी( किं. 3500 रुपये) आणि दोन ते तीन जणांसाठी नाशिक केसरी थाळी (किं.2100 रुपये) सुरू केली.

फॅशनची ही कोणती तऱ्हा? उर्फी जावेदचे फोटो पाहून नेटकरी हैराण

Spread the love
Exit mobile version