राष्ट्रवादीचे नेते (Amol Mitkari) अमोल मिटकरी सध्या चर्चेत आले आहे. पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे अशी त्यांनी मागणी केली आहे त्यामुळे सध्या ते चांगलेच चर्चेत आले आहेत. याआधी देखील संभाजी ब्रिगेडने याबाबत मागणी केली होती.
या संदर्भात अमोल मिटकरी यांनी एक ट्विट देखील केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “पुणे शहराचे नामकरण “जिजाऊ नगर” व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार”. सध्या त्यांचे ट्विट खूप चर्चेत आहे. यावर अनेकांनी वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
पुणे शहराचे नामकरण "जिजाऊ नगर" व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणाऱ्या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार.@mieknathshinde @Dev_Fadnavis pic.twitter.com/9mt46cpYWD
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 13, 2023
खुशखबर! गरिबांच्या अन्नधान्याची चिंता मिटली; आता दरमहा मिळणार जादा धान्य
दरम्यान याआधी देखील संभाजी ब्रिगेडने ही मागणी केली होती. संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक विकास पासलकर (Vikas Pasalkar) यांनी ही मागणी केली होती. राजमाता जिजाऊ यांनी पुणे शहराला वसविले त्यामुळे पुण्याचे नाव ’जिजाऊनगर’ करण्यात यावे असे त्यांनी म्हंटले होते.
बच्चू कडूंना लवकर बरं वाटण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुळजाभवानीला घातलं साकडं