‘नैसर्गिक शेती’ कृषी अभ्यासक्रमाचा भाग होणार; केंद्रीय कृषीमंत्र्यांची घोषणा

'Natural farming' to be part of agriculture curriculum; Announcement of Union Agriculture Minister

भारत हा कृषीप्रधान देश आहे. येथे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. परंतु, दिवसेंदिवस पारंपरिक शेती पध्द्तीत बदल होऊन आधुनिक शेती पद्धत सुरू झाली आहे. यामध्ये नैसर्गिक शेती काळाच्या ओघात मागे पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय कृषी व कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर ( Narendrasinh Tomar) यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. अगामी काळात कृषी अभ्यासक्रमात ‘नैसर्गिक शेती’ हा महत्त्वाचा भाग असणार आहे. असे ते म्हणाले आहेत.

“मी प्रत्येक गोष्टींवर…”, मानसी नाईकच्या पतीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

कृषी तंत्रज्ञान उपयोजन संशोधन संस्था (एटीआरी), जबलपूर आणि राजमाता विजयाराजे शिंदे कृषी विद्यापीठ, ग्वाल्हेर याठिकाणी आयोजित कार्यशाळेत नरेंद्रसिंह तोमर उपस्थित होते. नैसर्गिक शेतीविषयक असणाऱ्या या कार्यशाळेत बोलताना त्यांनी ” नैसर्गिक शेती ( Natural Farming) ही काळाची गरज आहे. नैसर्गिक पद्धतीने शेती केल्यास खर्च कमी होऊन उत्पादनाला चांगला भाव मिळतो,” असे सांगितले.

रस्त्यावरील धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी

भारतात अन्नधान्याचा तुटवडा भरून काढण्यासाठी रासायनिक खतांच्या वापरातील शेती सुरू झाली. यामुळे अन्नधान्याचे उत्पन्न वाढले. परंतु, यामध्ये आता बदल करणे आवश्यक आहे. सकस आहार, निरोगी मन आणि निरोगी शेतीसाठी नैसर्गिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे. यासाठी सरकार देखील प्रयत्न करत आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी देखील सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. अशी माहिती केंद्रीय कृषी व कल्याणमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव परिसरात धुळीमुळे भीषण अपघात! एकजण जागीच ठार तर पाच गंभीर जखमी

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *