
Bus Accident । सध्या अपघाताचे (Accident) प्रमाण खूप वाढले आहे. अनेकदा हे अपघात चालकाच्या चुकीमुळे होतात. यात अनेकांचा जीव जातो. यामुळे अनेक संसार उध्वस्त होतात. सध्या असाच एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात २० प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Latest marathi news)
Gyanvapi Masjid । कोर्टाचा मोठा निर्णय! ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्याची मिळाली परवानगी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्यातील नवापूर आगारातून राज्य परिवहन महामंडळाची बस पुणे जाण्यासाठी निघाली होती. नवापूर बसस्थानकातून निघालेल्या बसने (Navapur- Pune Bus Accident) धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून नवापुर, विसरवाडी, चिंचपाडा येथील प्रवासी घेऊन जाताना कोंडाईबारी घाटात आल्यानंतर उभ्या असणाऱ्या मालट्रकला मागून जोरदार धडक दिली.
अपघातात या बसमधील २० ते २२ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्य सुरु करत अपघातात जखमी काही प्रवाशांना दहिवेल, साक्री आणि विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातानंतर काही वेळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. बस चालक मोबाईलवर बोलत असतांना समोर दुर्लक्ष झाले आणि हा अपघात झाला, अशी धक्कादायक माहिती जखमी झालेल्या प्रवाशांनी दिली आहे.