Navi Mumbai । धक्कादायक प्रकार! ट्रक चालकाने पोलिसांना दगडाने आणि बांबूने केली जबर मारहाण

Navi Mumbai

Navi Mumbai । केंद्र सरकार (Central Govt) वेळोवेळी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये नेहमीच बदल करत असते. समाजाच्या हितासाठी हे बदल केले जात असल्याचे वेळोवेळी केंद्र सरकारकडून सांगितले जाते. नुकताच केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) सुधारणा केल्यामुळे वाहतूक व्यावसायिक चांगलेच संतप्त झाले आहेत. देशभरात केंद्र सरकारच्या या कायद्याला विरोध दर्शविला जात आहे. त्यामुळे ट्रक चालकांनी दुरुस्तीला विरोध करत देशभरात संप पुकारला आहे. (Latest Marathi News )

Mumbai-Nashik Expressway । नाशिक-मुंबई महामार्गावर अतिशय भीषण अपघात! पाच जण गंभीर जखमी

नवी मुंबई या ठिकाणी देखील या कायद्याच्या विरोधात वाहनचालक रस्त्यावर उतरल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र नवी मुंबईमध्ये या आंदोलनाला गालबोट लागले आहे. नवी मुंबईत आंदोलन करणाऱ्या ट्रकचालकांनी पोलिसांना दगडाने आणि बांबूने मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

Success Story । चर्चा तर होणारच! मन रमत नाही म्हणून सोडली पोलिसाची नोकरी, आज तूर शेतीतून करतोय लाखोंची कमाई

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात अवजड वाहतूक करणारे ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. उरण जेएनपीटी महामार्गावर ट्रक चालकाने रस्ता रोको आंदोलन सुरू केले. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना त्या ठिकाणाहून हटवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त चालकांनी पोलिसांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Most Expensive Bull । काय सांगता? 41 लाखांचा बैल, दरमहा करतो 2.5 लाखांची कमाई

Spread the love