Navi Mumbai । नवी मुंबईतील उरणमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या २० वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडल्याने येथे खळबळ उडाली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या यशश्री शिंदे (Yashshree Shinde) हीचा मृतदेह झुडपातून सापडला. यशश्रीच्या प्रियकरावर तिच्या हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाची अवस्था बिकट आहे.
Eknath Shinde | ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली आणखी एक भेट; ही गोष्ट मिळणारं आता मोफत
तिच्या पोटावर व पाठीवर धारदार शस्त्राने वार करून तिचे कपडेही फाडण्यात आले. त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यशश्रीचे एकापेक्षा जास्त मारेकरी असण्याची शक्यताही पोलिसांना आहे. यशश्री 20 जुलैपासून बेपत्ता होती, मात्र आज सकाळी तिचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळील झुडपात आढळून आला.
Pune News | पुण्यात पावसाचा हाहाकार, एकाच दिवसात चार जणांचा मृत्यू
मृतदेह पाहिल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली आणि घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. यशश्रीचे दुसऱ्या पंथातील मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे पोलिस तपासात सुरुवातीला समोर आले आहे. पोलीस तरुणीच्या प्रियकराचा शोध घेत आहेत. या हत्येत त्याचा हात असण्याची शक्यता आहे. यशश्रीचा मृतदेह सापडला तेव्हा तिची ओळख पटू नये म्हणून तिचे कपडे फाडण्यात आले होते आणि तिचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला होता.
Pune News | पुणे जिल्ह्यात मोठी दुर्घटना, बंगल्यावर दरड कोसळली, दोन-तीन जण गाडल्याची भीती
गुरुवारपासून बेपत्ता असतानाही शनिवारपर्यंत मुलगी सापडत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांप्रती प्रचंड संताप आहे. पोलीस या प्रकरणाचा वेगवेगळ्या प्रकारे तपास करत आहेत. अफेअरनंतर दोघांमध्ये लग्नाबाबत दुरावा निर्माण झाला, त्यामुळे प्रियकराने यशश्रीची हत्या केली, असा पोलिसांचा समज आहे.