
Navi Mumbai News । स्पा सेंटरच्या (Spa center) नावाखाली वेश्याव्यवसायाचे (Prostitution) अनेक धक्कादायक प्रकार सतत उघडकीस येत आहेत. कायदा कितीही कडक झाला असला तरीही वेश्याव्यवसाय होतच आहे. सध्या देखील नवी मुंबईत स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याची माहिती समोर आली आहे. (Navi Mumbai Crime News)
Rohit Pawar । रोहित पवार यांचा अजित पवार यांच्यावर सर्वात मोठा आरोप; म्हणाले, “त्यांनी एकट…”
याप्रकरणी पोलिसांनी वेश्याव्यवसायाच्या या काळ्या धंद्याची म्होरक्या असलेल्या एका महिलेला अटक केली आहे. आता पोलीस त्या महिलेची चौकशी करत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी दोन मुलींची देखील सुटका केली आहे. आता आरोपी महिलेची चौकशी केली जात असून याप्रकरणी अनेक नावे समोर येणाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Rajendra Patni Passed Away । राजकीय वर्तुळातून दुर्देवी बातमी! भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण नवी मुंबई टाऊनशिपमधील वाशी भागातील आहे. जिथे लोकप्रिय मॉलमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालतो. पोलिसांकडे वेश्याव्यवसायाचे रॅकेट चालत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी त्या स्पा सेंटरवर छापा टाकला आणि वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.
पोलिसांनी त्या स्पा सेंटरवर छापा टाकून एका ४० वर्षीय महिलेला वेश्याव्यवसायाच्या आरोपाखाली अटक केली. पीटीआयला यासंदर्भात माहिती देताना नवी मुंबई पोलिसांच्या मानव तस्करी विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले की, एका गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी बनावट ग्राहकाला स्पा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आणि हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. सध्या या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.
Beed News । धक्कादायक बातमी! शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न