गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन वीकमुळे सर्वत्र प्रेमाचे वातावरण होते. जगभरातील प्रेमी युगुलांनी हे दिवस जल्लोषात साजरे केले. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी देखील आमदार रवी राणा ( Navneet Rana & Ravi Rana) यांच्यासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला. एकमेकांसाठी वेळ काढुन हे दोघे कॉफी डेटवर गेले होते. दरम्यान व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने नवनीत राणा व रवी राणा यांची लव्हस्टोरी चर्चेत आली आहे. रामदेव बाबा यांच्या परवानगीने या दोघांचे प्रेम जुळले होते. असे म्हंटले जात आहे.
उर्फी जावेदने हटके स्टाईलमध्ये चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा, म्हणाली…
नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघातील अपक्ष खासदार आहेत आणि त्यांचे पती रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार आहेत. अभिनेत्री ते खासदार असा नवनीत राणा यांचा प्रवास आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांची सर्वात पहिली भेट रामदेव बाबा यांच्या आश्रमात झाली होती. हे दोघेही रामदेव बाबांच्या ( Ramdev Baba) योग शिबिरात सहभागी होण्यासाठी आले होते.
अशी झाली प्रार्थना बेहेरे आहे अभिषेकची भेट; वाचा प्रार्थनाची लव स्टोरी
या भेटीनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. काही काळानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2011 रोजी नवनीत आणि रवी राणा यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न केले. लग्नाला एवढी वर्षे होऊन देखील या दोघांमधील प्रेमाचा गोडवा आजही कायम आहे. हनुमानचालीसा प्रकरणात नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाली होती. यांनतर भेट झाल्यावर नवनीत राणा या रवी राणा यांचा हात हातात घेवून रडल्या होत्या. यातूनच त्यांचे प्रेमळ नाते दिसून येते.
सत्यजीत तांबेंच्या ट्विटमुळे राजकारणात ट्विस्ट! लवकरच करणार भाजपमध्ये प्रवेश?