Site icon e लोकहित | Marathi News

Navneet Rana । ब्रेकींग! भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच नवनीत राणा यांनी घेतला सर्वात मोठा निर्णय

Navneet Rana

Navneet Rana । आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) बुधवार, २७ मार्च रोजी उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने महाराष्ट्रातील अमरावतीमधून नवनीत राणा यांना तिकीट दिले आहे. दरम्यान, भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Crime News । अपहरण आणि हत्या… इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून उघड झाले खुनाचे रहस्य; घटना वाचून बसेल धक्का

माहितीनुसार, नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आता त्यांचा लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे आपला राजीनामा सोपवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Navneet Rana । ब्रेकिंग! अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपने दिली उमेदवारी

नवनीत राणा यांच्या राजीनाम्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्यांना युवा स्वाभिमान पक्ष लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Baramati News । अभि नवनाथ मदने यांची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड!

Spread the love
Exit mobile version