Navneet Rana । मागील अनेक दिवसांपासून आमदार, खासदार तसेच मंत्र्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच आता खासदार नवनीत राणा यांच्याबाबत एक महत्त्वाची बातमी आहे. नवनीत राणांना (MP Navneet Rana) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दोन देशांचं कनेक्शन समोर आले आहे. (Latest marathi news)
Crime News । धक्कादायक! भाजप आमदाराच्या पुतण्यावर भर बाजारात बेछूट गोळीबार, जागीच झाला मृत्यू
3 मार्च रोजी व्हॉट्सअॅपवर क्लिप पाठवून नवनीत राणा यांना ही धमकी दिली आहे. ही धमकी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी नवनीत राणा यांचे स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यानंतर पोलिसांनी फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कलम 354 A,354 D,506 (2),67 नुसार गुन्हे दाखल केला आहे. (Navneet Rana Receives Death Threat)
Politics News । उद्धव ठाकरे, मोदी पुन्हा एकत्र येणार? शिंदे गटातील नेत्याने स्पष्टच सांगितलं…
राणा यांना एका परदेशी नंबरवरुन धमकी देणारी व्हॉट्सअॅपला एक ऑडिओ क्लीप आली. या क्लीपमध्ये नवनीत राणा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दुपारी 2 वाजून 9 मिनिटांनी ही ऑडिओ क्लीप नवनीत राणा यांना आली. लगेचच 2 वाजून 13 मिनिटाने याच नंबरवरुन व्हॉट्सअप व्हाईस कॉल आला, पण नवनीत राणा यांनी घेतला नाही.