मुंबई : नवनीत राणा (Navneet Rana) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता नवनीत राणा त्यांच्या एका नृत्यानं चर्चेत आल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांनी शहरातील गरबा उत्सवाला हजेरी लावली. यावेळी नवनीत राणांनी देवीची पूजा केली व त्यांना गरबा खेळण्याचा देखील मोह आवरला नाही. त्यांनी तरुणासोबत गरबा खेळण्यास सुरुवात केली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.
अरे वा भारीच की! ‘या’ जिल्ह्यात गवती चहाच्या शेतीचा 250 एकरवर यशस्वी प्रयोग
गुजराती व हिंदी गाण्यावर नवनीत राणांनी नृत्यू केलं आहे. ठिकठिकाणी आता नवरात्रउत्सवानिमित्त गरबा खेळण्याचे आयोजन केले आहे. यामध्येच खासदार नवनीत राणा यांनाही गरबा खेळण्याचा मोह आवरला नाही. गुजराती गाण्यावर तरुण-तरुणींसोबत नवनीत राणा गरबा खेळण्यात रमून गेल्या.
Shivsena: शिवसेनेच धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
दरम्यान, शारदीय नवरात्र उत्सवाला कालपासून सुरवात झाली आहे. मागच्या दोन वर्षांपासून कोरोनाचा कहर होता. मात्र यंदा कोरोना कमी झाल्याने निर्बंध देखील हटवण्यात आले आहेत. त्यामुळे नऊ दिवस उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.
Alia-Ranbir: “आलीया रात्रभर बेडवर…”, रणबीर कपूरने केला आलियाच्या ‘या’ सवयीचा खुलासा