श्रीगोंदा: हिरडगाव ता.श्रीगोंदा (Shrigonda) येथे शारदीय नवरात्रउत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला आहे. गेली दोन वर्ष कोरोना महामारीमुळे या उत्सवात खंड पडला होता. पण यंदाच्या वर्षी कोरोना कमी झाल्याने पारंपरिक पद्धतीनुसार नवरात्रउत्सव साजरा करण्यात आला.
Shrigonda: श्रीगोंद्यात पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या, समोर आल धक्कादायक कारण; वाचा सविस्तर
दरम्यान, तुकाई देवीच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात येते. त्याचबरोबर रोज पहाटे आणि संध्याकाळी पूजापाठ करून देवीची आरती केली जाते. तसेच तुळजा भवानी माता तुळजापुर (Tuljapur) या ठिकाणावरून ज्योत आणली जाते. दसऱ्याच्या दिवशी देवीची गावातून पालखी मिरवणूक होते व त्याच रात्री फुल देण्याचा कार्यक्रम होतो. देवीने फुल दिल्यानंतर मध्यरात्री पालखी पाऊतकाला जाते व नंतर मिरवणुकीदरम्यान दिवसभर घरोघरी देवीची पूजा करून दर्शन घेतले जाते. त्यानंतर सायंकाळी देवीचे मंदिरामध्ये आगमन होते.
मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता
अशा पद्धतीने तुकाई मातेचा नवरात्रउत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.
धक्कादायक! दुर्गा पूजेला बकऱ्याच्या ऐवजी चिमुकल्याचाच गेला बळी, वाचा सविस्तर