Nawab Malik । सध्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अणूशक्तीनगरचे आमदार नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात जावं लागू शकतं, अशी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मलिक यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
नवाब मलिक दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर सुप्रीम कोर्टाने मलिकांना जामीन मंजूर केला होता, परंतु सध्या त्यांच्यावर मनी लॉंड्रिंग आणि अंडरवर्ल्डशी संबंधित गंभीर आरोप आहेत. या कारणामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात प्रक्रिया सुरू झाली आहे.
Sharad Pawar । ब्रेकिंग! निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा मोठा डाव; सदाभाऊ खोत यांना दिला मोठा झटका
नवाब मलिक सध्या शिवाजी नगर-मानखुर्द विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणुकीत सहभागी होण्याच्या तयारीत आहेत. भाजपने त्यांच्याविरुद्ध उमेदवार उभा केला असून, त्यांची उमेदवारी विरोधी पक्षांकडून विरोधाला सामोरी जात आहे. भाजपने आरोप केला आहे की, मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंध ठेवले होते, त्यामुळे त्यांचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात काय घटना घडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Sharad Pawar । बारामतीचे ‘दादा’ कोण? शरद पवारांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!