Nawab Malik । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक हे वैद्यकीय कारणामुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहे. पण आज अचानक नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. त्याबाबत त्यांची मुलगी सना मलिक (Sana Malik) यांनी माहिती दिली आहे. श्वसनासंदर्भात त्रास होऊ लागल्याने कुर्ला येथील रुग्णालयात आप्तकालीन कक्षात नवाब मलिक यांना दाखल केले आहे. (Latest marathi news)
दरम्यान, ईडीने 2022 मध्ये नवाब मलिक यांना गोवावाला कंपाऊंड प्रकरणात मनी लाँड्रिंग (Money laundering) कायद्याखाली अटक करण्यात आली होती. तेव्हापासून नवाब मलिक तुरुंगात होते. त्यानंतर ऑगस्ट 2023 मध्ये ते अटीशर्तीसह जामिनावर तुरुंगाबाहेर आले होते. पण प्रकृतीचे कारण देत त्यांना जामीन मिळाला आहे. आज अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे.
Congress । मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर, भाजप नेत्याच्या दाव्याने खळबळ
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर नवाब मलिक हे अधिवेशनात सत्ताधारी गटात बसले होते. त्यावरुन त्यांच्यावर खूप टीका झाली होती. जरी ते तुरुंगाबाहेर असले तरी ते सार्वजनिक कार्यक्रमात फारसे दिसले नाहीत. त्यानंतर आता त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे समोर आले असून डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे.