Site icon e लोकहित | Marathi News

राष्ट्रवादीला मित्रपक्षाकडून धक्का! 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

NCP is shocked by allies! 91 people joined Congress

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला गळती लागली आहे. अशातच आता राष्ट्रवादीला देखील मोठे खिंडार पडले आहे. मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. महाविकास आघाडीमध्ये सोबत असणाऱ्या काँग्रेसकडूनच डच्चु मिळाल्याने राष्ट्रवादी धक्क्यात आहे.

“संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे”, भाजपच्या नेत्याने राऊतांवर केली जहरी टीका

पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP) अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आमदार संग्राम धोपटे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला खिंडार पडल्याने पक्षात खळबळ माजली आहे. याचे पडसाद अगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसणार असून यामुळे काँग्रेसची (Congress) ताकद वाढणार आहे.

मोठी बातमी! भाजपने फोडला शरद पवारांचा ‘हा’ विश्वासू नेता

मध्यंतरी विजयबापू शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली बारामती लोकसभा, इंदापूर तालुका, करमाळा सोलापूर येथील कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर भोर तालुक्यात (Bhor Taluka) भावेखल येथे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली 91 जणांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

‘दादा मला माफ करा…’; गौतमी पाटीलने मागितली अजितदादांची माफी

Spread the love
Exit mobile version