“धन्य त्यांची हास्यजत्रा…”, राज ठाकरेंच्या मेळाव्यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांची जोरदार टीका

NCP leader Amol Mitkari criticizes Raj Thackeray's gathering, "Blessed is their laughter fair..."

आज झालेल्या गुढीपाडवा सभेत राज ठाकरे यांनी अनेक वेगेवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आता सरकार बदलले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना हे नाव देखील आले आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही चालतो, असे ते म्हणतात. म्हणून माझी त्यांना विनंती आहे की मागच्या सरकारने माझ्या 17000 सैनिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

त्याचबरोबर शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या असं राज ठाकरे म्हणाले आहेत. त्याचबरोबर इतकी वर्षे शिवसेना पाहिली, जगलो होतो. अनेकांच्या घामातून, रक्तातून शिवसेना उभी राहिली असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे शिवसेना आणि धनुष्यबाण हे गेल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. याचबरोबर राज ठाकरे यांनी अनेक वेगेवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले आहे. दरम्यान आता यावर प्रतिक्रिया देत राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंच्या मेळाव्यावर जोरदार टीका केली आहे.

मशिदीवरील भोंग्यांवरून राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गंभीर इशारा!

याबाबत अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले की, “धन्य ते हास्यसम्राट आणि धन्य त्यांची हास्यजत्रा.. महागाई , बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही देणघेणे नसलेले हास्यसम्राट ६ जुन ला “रायगड” जाणार असं समजल, पण हे महाशय गड चढुन जाण्याची हिम्मत करतील का? कसं आहे ,गड चढायला मावळ्याचं काळीज असावं लागतं.. कावळ्याची टिवटिव नव्हे”

“सिंह घुसला थेट गावात अन् घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *