राज्यात एकीकडे सत्तासंघर्षाचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते ‘अजित पवार भाजपसोबत जाणार’ या चर्चांना उधाण आले आहे. काल अचानक अजित पवारांनी पुण्यातील दौरा रद्द केल्याने या चर्चांना बळ मिळाले आहे. महाराष्ट्रात ( Maharashtra) लवकरच राजकीय भूकंप येऊ शकतो. अशी शक्यता राजकीय नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने मोठे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे ( Manikrao Kokate) यांनी उघड उघड अजित पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. ‘अजित पवार जिकडे जातील तिकडे आम्ही जाणार’ अशी रोखठोक भूमिका कोकाटे यांनी मांडली आहे.
अजित पवार पुण्यातील दौरा रद्द करून गायब! राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता; चर्चांना उधाण
” अजित पवार ( Ajit Pawar) राज्यातील लोकांचे प्रश्न अगदी समर्थपणे सोडवू शकतात. हे राज्यातील सर्व जमतेला माहिती आहे. आम्ही सर्व अजित दादा आणि शरद पवार साहेबांच्या बरोबरच आहोत. यावर अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र परिस्थितीनुसार आमही निर्णय घेऊ.” असे माणिकराव कोकाटे यांनी म्हंटले आहे.
१२ वर्षांच्या मुलाची बॉडी पाहून तुम्हालाही बसेल धक्का; पाहा Video