Site icon e लोकहित | Marathi News

NCP MLA disqualification Case । राष्ट्रवादी आमदार प्रकरणात समोर आली सर्वात मोठी अपडेट!

NCP MLA disqualification Case

NCP MLA disqualification Case । राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाची सुनावणी संपली असून पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 23 जानेवारीला सकाळी ११ वाजता ही सुनावणी होणार आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नवीन वेळापत्रक जाहीर केल आहे.

Sharad Pawar । अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याचा शरद पवारांनी घेतला समाचार

माहितीनुसार, 23, 24 जानेवारीला उर्वरित चार जणांची उलट तपासणी होणार आहे. त्याचबरोबर 25 तारखेला अन्य दोन साक्षीदारांची उलट साक्ष नोंदवली जाणार आहे आणि नंतर 29 जानेवारीला दोन्ही गटांचे लेखी सबमिशन दिले जाणार असून 30 तारखेला अंतिम युक्तिवाद होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की 31 जानेवारीला सुनावणी पूर्ण करायची आहे. त्यामुळे आठ ते दहा दिवसात अंतिम निकाल जाहीर करणार आहे. असे ते म्हणाले आहेत.

Jodhpur Train Accident । पाळीव कुत्र्याने घेतला बहीण-भावाचा जीव, घडलं भयंकर; वाचून बसेल धक्का

आजच्या सुनावणी नेमकं काय घडलं?

शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांना अनिल पाटील यांच्या विरोधात आमच्याकडे काही नवीन कागदपत्रे आहेत. ते आम्ही सुनावणी दरम्यान सादर करू अशी माहिती दिली. जर दोन्ही गटांच्या बाजू योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकात बदल करावा लागेल. असे अध्यक्षांनी म्हटले आहे. त्यानुसार नवीन वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता आमदार प्रकरणात नेमका निकाल काय येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Pune Metro । थरकाप उडवणारी घटना! मृत्यू अवघ्या 30 मीटर अंतरावर, पुणे मेट्रो ट्रॅकवर ३ वर्षाच्या मुलासह आई पडली…

Spread the love
Exit mobile version