NCP MLA Disqualification । मोठी बातमी! राष्ट्रवादी अजितदादांचीच, विधानसभा अध्यक्षांचा निकाल

NCP MLA Disqualification

NCP MLA Disqualification । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिला. शरद पवार यांच्या सर्व याचिका राहुल नार्वेकरांनी फेटाळत अजित पवार यांचे सर्व आमदरांना पात्र ठरवले आहेत. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजितदादांनी जिंकली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात निर्णय घेण्यात आला आहे.

Yuvraj Pathare । मोठी बातमी! शिवसेना नगरसेवकावर प्राणघातक हल्ला

अजित पवार यांच्या गटाला ४१ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सभापती राहुल नार्वेकर यांनी सांगितले. अजितदादांना शरद पवारांपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे, त्यामुळे अजितदादांचा गट हीच खरी राष्ट्रवादी आहे. अजित पवार गटाकडून अनिल पाटील आणि समीर भुजबळ सुनावणीला उपस्थित होते. शरद पवार गटाच्या वतीने तीन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अजित पवार गटाच्या वतीने दोन याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. एकूण पाच याचिका होत्या ज्या दोन भागात विभागल्या होत्या, गट १ आणि गट २.

Rohit Pawar । निवडणुकांच्या पार्शवभूमीवर रोहित पवार यांचं सर्वात मोठं विधान!

याबाबत राहुल नार्वेकर म्हणाले की, राष्ट्रवादीत कोणतीही फूट नाही. फक्त एक गट तयार झाला आहे. प्राथमिक स्तरावर त्यांनी पक्ष रचना, घटना आणि विधिमंडळ संख्या या तीन गोष्टींवर आपला निर्णय दिला. ते म्हणाले की, 30 जून 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते. 29 जूनपर्यंत शरद पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नच नव्हता. राष्ट्रवादी घटनेबाबत कोणताही वाद नाही.

Pune Crime । पुण्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य, १५ दिवस लॉजवर ठेवले अन्…

Spread the love