NCP MLA Disqualification । मागील वर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वात मोठी फूट पाडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पक्षात फूट पडूनही आजही अनेक पदाधिकारी अजित पवार गटात सहभागी होत आहेत. खरी राष्ट्रवादी कोणाची? यावर अजून निर्णय झाला नाही. सध्या याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर सुनावणी सुरु आहे. (Latest marathi news)
Crime News । धक्कादायक बातमी! कोल्ड ड्रिंकमधून विष पाजून जन्मदात्या वडिलांनीच घेतला मुलाचा जीव
काल याप्रकरणी सुनावणी झाली आहे. यावेळी या सुनावणीवेळी आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. यावेळी वकिलांनी विचारलेल्या प्रश्नांवर अनिल पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये आमदार सरकारमध्ये सहभागी झाले तेव्हा नेमकं काय घडलं होतं? याबाबत अनिल पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
अनिल पाटील यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात मोठा दावा केला आहे. सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा बहुमताने घेण्यात आला आणि तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाच्या आमदारांना कळविण्यात आला, असा मोठा गौप्यस्फोट अनिल पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर या काळात काय-काय घडामोडी घडल्या होत्या याबाबत देखील त्यांनी सुनावणीवेळी सविस्तर माहिती दिली.