Lok Sabha Election । राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha Election 2024) पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर करू शकते. पण लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. जवळचा माणूस निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest marathi news)
अजित पवार गटात असणारे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) शरद पवार गटाकडून लोकसभा लढवणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. अशातच आता यावर आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “अनेक लोक हातातील घड्याळ काढून तुतारी वाजविण्यास सज्ज असतील अशी आम्हाला आशा आहे, असे तनपुरे म्हणाले आहेत.
निलेश लंके लवकरच शरद पवार गटामध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवतील असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, “लोकसभेसाठी माझं नाव चर्चेत नाही. मी लोकसभा नाही तर मी विधानसभा लढवणार आहे. महाविकास आघाडीकडून नगर दक्षिणेसाठी तोला मोलाचा उमेदवार देण्यात येईल,” असेही प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे.