NCP Party and Symbol । महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडल्या आहेत. सध्या देखील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत सर्वात मोठा निर्णय दिला आहे. या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा पराभव झाला असून अजित पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आले आहे. (EC decision on NCP name and symbol)
Accident News । हृदयद्रावक! ट्रक-दुचाकीची भीषण धडक, अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू
पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाल्यामुळे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. मात्र शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळाला आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. यामुळे आता शरद पवार गटाला निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे.
गेल्या अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची प्रतीक्षा होती. तो निकाल आज अखेर जाहीर झाला. आजच्या सुनावणीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे स्वतः उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या गटाचे दिग्गज नेते देखील या सुनावणीला हजर होते. स्वतः शरद पवार सुनावणीला हजर असून देखील अजित पवार यांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे.