मुंबई : सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. अज्ञात व्यक्तीने शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवास्थानी फोन करून ‘देशी कट्ट्याने ठार मारू’, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे आता शरद पवार यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.
मोठी बातमी! ‘या’ भाजप नेत्याने नरेंद्र मोदींची तुलना केली रावणाशी
शरद पवार (Sharad Pawar) यांना धमकीचा फोन कुठून आला हे अद्याप समजलेले नाही. पण याचा तपास पोलीस यंत्रणा (Police system) करत आहे. शरद पवार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.
सह्याद्रीपुत्राचा ट्रेक करताना 200 फूट खोल दरीत पडून मृत्यु
याआधी देखील शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात अली होती. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, यापूर्वी देखील याच व्यक्तीने एकदा शरद पवार यांना धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलं होतं.
हिरडगाव येथील साईकृपा कारखाना उसाला देणार एकरकमी २७०० रुपयांचा दर