Rahul Narvekar । गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्का बसला. अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजूनही खरी राष्ट्रवादी कोणाची यावर निर्णय होऊ शकला नाही. यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Latest marathi news)
Accident News । हृदयद्रावक! ट्रक-दुचाकीची भीषण धडक, अपघातात मायलेकाचा जागीच मृत्यू
नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानुसार हा निकाल ३१ जानेवारी रोजी द्यायला हवा होता. पण नार्वेकरांच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितली. त्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने आता १५ फेब्रुवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले असून निकालाला अवघे काही दिवस उरलेले असताना याबाबत कोणतीच हालचाल दिसून येत नाही.
पत्रकारांनी नार्वेकरांना निकाल केव्हा लागणार? असा प्रश्न विचारताच त्यांनी केवळ ‘जय श्रीराम’ असं उत्तर दिलं आहे. त्यांनी दिलेल्या उत्तरावरून राष्ट्रवादीचा निकाल कधी लागणार हे अजून स्पष्ट झाले नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार नार्वेकरांना १५ फेब्रुवारीच्या आत निकाल लावावा लागणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे कोणाच्या बाजूने निकाल लागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.