मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसही (Nationalist Congress) देखील संवाद यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. सध्या संवाद यात्रा काढल्याने लोकांच्या जवळ जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेता येतात. यात्रा लोकांची प्रश्न जाणून घेण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आता पुन्हा संवाद यात्रेतून संपर्क करणार. या संवाद यात्रेविषयी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी माहिती दिली.
शिंदे-फडणवीस सरकार अखेर शेतकऱ्यांना पावले; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ‘हे’ मोठे निर्णय
राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो यात्रेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी देखील आता शेतकरी संपर्क यात्रा सुरु करणार आहे. पुढच्या महिन्यात ही यात्रा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या संवाद यात्रेचे नेतृत्व विरोधी पक्ष नेते अजित पवार करणार आहेत.
आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना चॅलेंज; म्हणाले, “माध्यमांसमोर माझ्याशी चर्चा करून दाखवावी”
या यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या (Farmer) पिकांना कमी भाव मिळतो त्या विषयावर आवाज उठविणार आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे.
चिखली येथे मंळगंगा युवा प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन