
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज(Mohit kamboj) हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात.दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी एकापाठोपाठ ट्विट करून त्यांनी राष्ट्रवादीला एक धक्कादायक इशारा दिला होता . माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh), माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांच्यानंतर राष्ट्रवादीचा(NCP) आणखी एक बडा नेता अडचणीत येणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान आज ट्विट करत त्यांनी बेधडक राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांच्यावर निशाणा साधलाय.
नवे ट्विट करत कंबोज म्हणाले की ‘मी बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा सखोल अभ्यास करतोय. आणि त्या संदर्भातील अधिकचे अपडेट लवकरच देईल.’दरम्यान आता विचार करण्याची बाब म्हणजे कंबोज यांनी काही दिवसांआधी इशारा केलेला ‘राष्ट्रवादीचा बडा नेता’ रोहित पवार आहेत का? असा प्रश्न विचारला जातोय.
मोहित कंबोज जुन्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, “माझं हे ट्विट सेव्ह करुन ठेवा! अनिल देखमुख, नवाब मलिकांपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या एक मोठा नेता मलिक, देशमुखांच्या भेटीला जाणार आहे. तेव्हा जेलवारीसाठी तयार राहा!”, असं सूचक इशारा देणारं ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.
शिवाय आपना स्ट्राईक रेट 100 है!, असंही ट्विट कंबोज यांनी केलं होतं. आज त्यांनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधलाय.