Neelam Gorhe । महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित होणार का? नीलम गोर्‍हे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाल्या..

Neelam Gorhe
Neelam Gorhe

Maharashtra Legislative Assembly Winter Session । सध्या राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आंदोलने, सभा, जाळपोळ होऊन देखील अजूनही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताच तोडगा निघालेला नाही. दरम्यान, विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार का? याबाबत अनेकांमध्ये चर्चा सुरु होती. आता याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. (Maharashtra Politics)

Pune News । धक्कादायक! मालवाहू करणाऱ्या ट्रक चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मंगळवारी दिली. गोर्‍हे विधानभवनात ७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Maharashtra Legislative Assembly Winter Session)

Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांना भर सभेत शिवीगाळ; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याला अटक

नीलम गोर्‍हे म्हणाल्या, “हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल यात शंका नाही. पण जोपर्यंत सर्व कामकाज आणि इतर प्रक्रिया पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी (चर्चेची) तारीख जाहीर करू शकत नाही…पण आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही सभागृहात चर्चा होईल आणि त्यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

Politics News । आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच जेलमध्ये जाणार…बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Spread the love