Site icon e लोकहित | Marathi News

Neeraj Chopra: नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, डायमंड ट्रॉफी जिंकणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

Neeraj Chopra made history again, becoming the first Indian player to win the Diamond Trophy

दिल्ली : टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भालाफेकपटू नीरज चौप्राने (Neeraj Chopra)सुवर्णपदक पटकावत इतिहास रचला होता. 2022च्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये नीरजने रौप्य पदक मिळवले होते. दरम्यान आता 24 वर्षीय नीरज हा प्रतिष्ठित डायमंड ट्रॉफी (Daimond league trophy)जिंकणारा (won) पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. चेक प्रजासत्ताकचा याकूब वाडलेज आणि जर्मनीच्या जुलियन वैब्बर या दोघांना मागे टाकत नीरजने या डायमंड ट्रॉफी जिंकली आहे.

दररोज बिट खाल्ल्याने शरीरास होतात ‘हे’ लाभदायक फायदे; वाचा सविस्तर माहिती

डायमंड लीगच्या पुरुष गटातील अंतिम फेरीत नीरजने ८८.४४ मीटर भालाफेक करून हा विजय मिळवला. स्वित्झर्लंडच्या झुरिचमध्ये ही डायमंड लीग पार पडली. नीरज चोप्राची डायमंड लीग जिंकण्याची इच्छा होती. दरम्यान अथक प्रयत्नानंतर नीरजचे हे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. पहिल्या फेरीत याकूब वाडलेजने नीरजला मागे टाकत 84.15 मीटर भालाफेक करत आघाडी मिळवली होती.

Vikhe patil: “भारत जोडो ऐवजी, काँग्रेस…” , विखे पाटलांचा राहुल गांधींवर घणाघात

दरम्यान त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नान नीरजने 88.44 मीटर भालाफेक करत स्पर्धेत वर्चस्व निर्माण केले. पुढे तिसऱ्या फेरीत 88 मीटर, चौथ्या फेरीत 86.11 मीटर, पाचव्या फेरीत 87 मीटर आणि सहाव्या अंतिम फेरीत नीरजने 83.60 मीटर अंतरावर भालाफेक करत विजय मिळवला. 86.94 मीटरच्या सर्वोच्च प्रयत्नासह वाडलेजने दुसरे स्थान पटकावले.

Supriya Sule: राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

Spread the love
Exit mobile version