Neeraj Chopra । बुडापेस्ट : नीरज चोप्राची गोल्डन बॉय (Golden Boy) अशी ओळख आहे. नुकताच त्याने डबल धमाका केला आहे. त्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने आता जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championships) चमकदार कामगिरी केली आहे. पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली असून त्याच्या पहिल्याच थ्रोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. (Latest Marathi News)
Agriculture News | कोथिंबीरीला भाव नसल्याने शेतकऱ्यानं एक एकर कोथिंबिरीवर फिरवला रोटर
त्याने फेकलेला भाला हा 88.77 मीटर लांब गेला आहे. या कामगिरीसह त्याने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. येत्या रविवारी 27 ऑगस्ट रोजी सुवर्ण पदकासाठी सामना पार पडणार आहे. गेल्या वर्षी त्याला गोल्ड मेडल जिंकता आले नव्हते. त्यामुळे आता त्याचे लक्ष गोल्ड मेडलवर असणार आहे. या सामन्याकडे चाहत्यांसह संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे. (Neeraj Chopra Javelin Throw World Championships 2023)
Onion Rate । शेतकऱ्यांना मोठा फटका! निर्यात शुल्क वाढीनंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण
दरम्यान, पुढच्या वर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे त्याने या स्पर्धेचे तिकीट कन्फर्म केले आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पात्र होण्यासाठी त्याला 85.50 मीटर लांब भाला (Neeraj Chopra Javelin Throw) फेकायचा होता. परंतु त्याने फेकलेला भाला 88.77 मीटर लांब गेला.
Sharad Pawar । लवकरच अजित पवार रिटर्न्स भाग-२ पाहायला मिळेल, काँग्रेस नेत्याच्या विधानाने खळबळ
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नीरजला मोठी कामगिरी करण्याची सुवर्णसंधी आहे. जर त्याने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले तर तो नेमबाज अभिनव बिंद्राची बरोबरी करेल. अभिनव बिंद्राने ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिपच्या वैयक्तिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. जर नीरजनेही पदक जिंकले तर असे करणारा तो दुसरा भारतीय ठरू शकेल.