Neeraj Chopra: नीरज चोप्राचा ऐतिहासिक पराक्रम, डायमंड लीगचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला

Neeraj Chopra's historic feat created history by winning the Diamond League title

दिल्ली : ऑलिम्पिक गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये इतिहास राचलाय. नीरज चोप्राने शुक्रवारी डायमंड लीग मीटचे लॉसने स्टेज विजेतेपद जिंकले आहे. हे विजेतेपद जिंकणारा तो पहिला भारतीय ठरलाय.

याचसोबत त्याने झुरिच येथे ७ आणि ८ सप्टेंबर रोजी डायमंड लीगची अंतिम फेरी गाठली आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय आहे, तसेच हंगेरीतील बुडापेस्ट येथे २०२३ च्या जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नामध्ये ८९.०८ मी. पुनरावृत्ती ८९.०८ मी भालाफेक करून विजेतेपद पटकावले. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. दुखापतीमुळे तो बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नाही.

हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेलला नीरज चोप्रा डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. चोप्रापूर्वी, डिस्कस थ्रोअर विकास गौडा हा डायमंड लीगच्या पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवणारा एकमेव भारतीय आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *