सरकारकडून ग्रामीण भागातील लोकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. राष्ट्राचा विकास करायचा असेल तर खेड्याकडे चला असा मूलमंत्र महात्मा गांधी यांनी दिला होता. यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार प्रयत्नशील असते. ग्रामीण भागातील शेती व इतर व्यवसायांसाठी सरकारकडून विविध योजनांमार्फत निधी वितरित केला जातो. परंतु, हा निधी योग्य लाभार्थ्यां पर्यंत पोहोचतो का ?
गूगलवर चुकूनसुद्धा सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खाल जेलची हवा
ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक अशिक्षित असतात. त्यामुळे या योजना व निधी याबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. याबाबत गावातील लोकांना साक्षर करणे हे मुळात ग्रामपंचायत व तेथील लोकप्रतिनिधी यांचे काम असते. मात्र, अनेक ठिकणी हे लोकप्रतिनिधी सरकारकडून आलेला निधी योग्य त्या व्यक्ती पर्यंत पोहोचविण्यात अपयशी ठरतात किंवा बहुतांश वेळा जाणूनबुजून हा निधी लाभार्थ्यांमध्ये वितरित न करता वैयक्तिक रित्या स्वतःकडे घेऊन भ्रष्टाचार केला जातो.
ठाकरेंच्या घरात सनई चौघडा वाजणार; आदित्य ठाकरेंचं ‘या’ वर्षी लग्न होणार?
14व्या वित्त आयोगातून तब्बल 41,25,120 रू पिंपरी गावासाठी निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये
1 – गावातील सार्वजनिक ठिकाणी ड्रेनेज आणी गटर्स यासाठी 3,50000 रू
2 – वाल्मीक नारायण झेंडे वस्ती येथे पुरवठा वितरण आणि टॅप कनेक्शन यासाठी 1,55,0000 रू
3 – महिला बचत गटाच्या व्यवसायासाठी आवश्यक उपाययोजना करणे यासाठी 43,000 रू
4 -उर्वरित अंगणवाड्यांची दुरुस्ती यासाठी 50,000 रू
5 – महिला आणि मुलींसाठी सार्वजनिक सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीनची स्थापना यासाठी 50,000 रू
6 – सर्व अंगणवाड्यांना गॅस कनेक्शन यासाठी 45,000 रू
7 – महिला आणि मुलींसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहांची स्थापना यासाठी 1,00,000 रू
8 – शेतीच्या वाहतुकीसाठी शिंदेमळा आबा महादेव कर्चे येथील जुन्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम यासाठी 3,33,000 रू
9 – विकास नगर (लांडे वस्ती) ते काशिनाथ पारबती करचे घर असा रस्ता करणे यासाठी 3,43,895 रू
10 – गावातील बंद गटार आणि गटारांचे खड्डे बांधणे यासाठी 1,57,470 रू
‘त्या’ 19 बंगल्यांमुळे रश्मी ठाकरे गोत्यात! किरीट सोमय्या यांनी पोलिसांत दिली तक्रार…
11 – गावातील पाणी पुरवठा वितरण व नळ कनेक्शन दुरुस्त करणे यासाठी 4,09,440 रू
12 -गोविंद नामदेव करचे वस्ती ते हरणटेक वस्तीपर्यंत पाईपलाईनचे वितरण यासाठी 6,00,000 रू
13 – स्वच्छ भारत मिशन घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन (कृती संगम) यासाठी 3,07,470 रू
14 – जि.प.शाळा राणगटवाडी शाळेची दुरुस्ती यासाठी 2,90,000 रू
15 – आपले सरकार सेवा केंद्र दुरूस्ती आणी केंद्र चालक मानधन यासाठी 1,47,992 रू
16 – जि.प.शाळा खडकमळा शौचालय व मुतार्याचे बांधकाम यासाठी 2,00,000 रू
17 – मारुती मंदिर ते प्रल्हाद धोंडीबा कर्चे घर (खडगमाळा) पर्यंत रस्ता करणे यासाठी 2,00,000 रू
18 – ग्रामपंचायत कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात यासाठी 44,987 रू या कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे. परंतू यातील एकही रू या कामांसाठी खर्च झाला नाही.
पुणे तिथे काय उणे! पुण्यातील व्यक्तीने झोमॅटोवर वर्षभरात ऑर्डर केले तब्बल 28 लाखांचे जेवण
दरम्यान, यामुळे योजना सुरू करण्यामागे सरकारचा असलेला उद्देश बाजूला राहतो व महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ लाभार्थी हक्काच्या मदतीपासून वंचित राहतो. आज ग्रामीण भागातील कितीतरी शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान झालेले पहायला मिळते.
(प्रतिनिधी – सौरभ कर्चे)
“…म्हणून चंद्रकांत पाटील भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यास अनुपस्थित”