Site icon e लोकहित | Marathi News

Nepal Bus Accident । महाराष्ट्रावर मोठी शोककळा! नेपाळमधील बस दुर्घटनेत जळगावातील 27 जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री शिंदे यांचे महत्वाचे आदेश

Nepal Bus Accident

Nepal Bus Accident । नेपाळमध्ये एका भीषण बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील 27 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातील मर्स्यांगडी नदीत कोसळलेल्या बसमधील 40 भारतीय पर्यटकांपैकी 27 जण मृत्यूमुखी पडले आहेत, तर 16 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जणांमध्ये जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्याचे रहिवासी आहेत.

Sharad Pawar । झेड प्लस सुरक्षेबाबत शरद पवारांचे सर्वात मोठे वक्तव्य!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करत, मृतांच्या कुटुंबियांप्रति सहवेदना व्यक्त केली आहे. त्यांनी अपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अन्य केंद्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अमित शाह यांनी शिंदे यांच्या मागणीला प्रतिसाद देत वायुसेनेच्या विशेष विमानाने मृतदेह भारतात आणण्यासाठी सहाय्य करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

Badlapur News । बदलापुर अत्याचार प्रकरणी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या तरुणीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

दुर्घटनेनंतर, वायुसेनेच्या विशेष विमानाद्वारे मृतदेह गोरखपूर येथून नाशिककडे आणले जातील आणि कुटुंबीयांना सुपूर्द केले जातील. नेपाळमधील मदत पथकाने बचावकार्य सुरु केले असून, जखमींना उपचार दिले जात आहेत आणि बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 24 जणांचा मृत्यू झाला असून, अपघातातील कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे.

Daund News । दौंड तालुक्यात शिक्षकाकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; गावात संतापाची लाट

Spread the love
Exit mobile version