मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया ‘ब्रह्मास्त्र’ या बहुचर्चित चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दोघे ऑन स्क्रीन एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची समाज माध्यमांमध्येही जोरदार चर्चा होताना दिसतेय. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे प्रमोशन देखील जोरदार सुरू आहे.
नुकतंच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनकरिता त्यांची संपूर्ण टीम चेन्नईमध्ये गेली होती. यावेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये रणबीर कपूर दाक्षिणात्य पद्धतीने केळीच्या पानावर जेवण करताना दिसतोय.
Virat kohali: विराट कोहली धोनीच्या आठवणीत झाला भावूक, फोटो शेअर करत म्हणाला…
रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगेवेगळ्या कमेंट देखील करत आहेत. काही चाहते रणबीरचे कौतुक करत आहेत तर काहीजण त्याला ट्रोलही करत आहेत.