
मुंबई : उर्फी जावेद (Urfi Javed) सोशल मीडियावर कायम काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. बऱ्याचदा उर्फी तिच्या कपड्यांने लोकांची मने जिंकते, तर कधी तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. आता उर्फीने एक वेगळीच फॅशन केली आहे. तिने पूर्ण कपडे घातले नसून शंखाने तिचे शरीर झाकले आहे.
उर्फीने तिच्या या नवीन लुकचा व्हिडीओ तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे (Video) उर्फीला ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
राज्यात साडेआठ हजार शाळांमध्ये राबवली जाणार ‘पीएमश्री’ योजना, वाचा नेमकी काय आहे ही योजना?
उर्फीच्या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट करत आहेत. यामध्ये एका युजरने लिहिले की, ‘युनिक कॉन्सेप्ट… तर दुसऱ्या युजरने लिहिले की,‘आयकॉन.’ एक युजर कमेंट करत उर्फीला म्हणाला की, तुम्ही कधीच सुधरणार नाहीत. एकाने लिहिले की, लाज वाटुद्या, आता फक्त हेच बघायचे राहिले होते. अशा अनेक वेगेवेगळ्या कमेंट सोशल मीडियावर युजर्स करत आहेत.
कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घुसला घरात; पण शेतकऱ्याने केला जेरबंद