Site icon e लोकहित | Marathi News

आईला काम करताना ऊन लागू नये म्हणून चिमुरडीने केलेले कृत्य पाहून नेटकरी भावुक; पाहा VIDEO

Netkari is emotional after seeing what the little girl did to prevent her mother from getting hot while working; Watch the VIDEO

प्रत्येक लेकराला आपली आई प्रिय असते. आई आणि लेकरांमधील मधील नाते हे प्रचंड भावनिक व प्रेमळ असते. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना वेळोवेळी याचे दाखले देतच असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगी व तिच्या आईमधील प्रेमळ (Mother – Daughter Bond) नाते पहायला मिळत आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर भरपूर पसंती मिळाली असून प्रतिक्रियांचा देखील अक्षरशः पाऊस पडतोय.

मोठी बातमी! चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर फळे विकण्यासाठी बसली आहे. यावेळी उन्हामुळे आपल्या आईला गरम होत आहे. अस जाणवताच तिच्या मुलीने आपल्या आईला कडक उन्हापासून वाचवण्यासाठी आपल्या चिमुकल्या हातांनी वारा घालण्याचा प्रयत्न करत आहे. या चिमुकल्या मुलीचे आपल्या आईप्रति प्रेम पाहून नेटकरी भारावून गेले आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक अक्षय इंडिकर ( Akshay Indikar) याने देखील हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडिया हॅन्डल वरून शेअर केला आहे.

मोठी बातमी! राज्यात पदवी शिक्षण 4 वर्षांचे होणार; विद्यापीठांना नियमावली काढण्याचे आदेश

एक मुलगीच आपल्या आई-वडिलांना उत्तम प्रकारे सांभाळू शकते आणि त्यांचा त्रास समजू शकते, या माया लेकींचे नाते असेच बहरत राहो, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. हा व्हिडीओ 2011 मध्ये पोस्ट करण्यात आला होता. त्यावेळी देखील त्याला प्रसिद्धी मिळाली होती. परंतु, आता 10 वर्षांनी पुन्हा एकदा या व्हिडीओ ला लोकांनी पसंती दिली आहे.

धक्कादायक! सहलीला निघालेल्या विदयार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात

Spread the love
Exit mobile version