खेळाडूंच्या जर्सी हा त्यांच्या चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय असतो. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीत थोडासा बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. भारतीय संघ आज (दि.3) श्रीलंकेविरुद्ध आपला पहिला T20 सामना खेळणार आहे. दरम्यान संघातील काही खेळाडूंनी या T20 मालिकेसाठीच्या नव्या जर्सीसह आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
आर्चीच्या ‘त्या’ लुकची चर्चा; लोक म्हणाले, “एवढा पैसा आलाय तर…”
या जर्सीवर एमपीएल ( MPL) यांचा लोगो नसून किलर यांचा लोगो आहे. आतापर्यंत बीसीसीआयचे जर्सी प्रयोजक एमपीएल होते. मात्र त्यांनी आचनकपणे बीसीसीआय सोबतचा आपला करार संपवत सर्व हक्क केवाल किरण क्लोथिंग लिमिटेड कडे हस्तांतरित केले आहेत. परंतु, मार्चपर्यंत कोणत्याही प्रयोजकाला आपले हक्क हस्तांतरित करता येणार नाहीत. असा निर्णय बीसीसीआयच्या ( BCCI) अँपेक्स कौन्सिल मिटिंग मध्ये झाला होता.
मात्र खेळाडूंनी पोस्ट केलेल्या फोटोंमधील जर्सीवर अचानकपणे किलर यांचा लोगो दिसत आहेत. त्यामुळे एमपीएलने आपला करार संपुष्टात आणल्याचे स्पष्ट होत आहे. बीसीसीआय व एमपीएल यांच्यातील जर्सी स्पॉन्सरशीपचा करार हा या वर्षाअखेर पर्यंतचा होता. 2020 मध्ये नायकी कडून एमपीएल ने हक्क मिळवले होते. मागील सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये बीसीसीआयला बसलेला हा तिसरा धक्का आहे. याआधी पेटीएम, त्यानंतर बायज्युस व आता एमपीएल यांनी करार संपण्याअगोदरच बीसीसीआयला बाय-बाय केले आहे.
“… तर अजित पवारांना पाकिस्तानमध्ये रवाना करा”; भाजप नेत्यांची मागणी