मागील काही दिवसांपासून महावितरण ने थकीत वीजबिल मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कडून काही भागांत वीजतोडणी देखील करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थकीत वीजबिलाला स्थगिती देऊन फक्त चालू वीजबिल भरण्याचे आदेश दिले होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज जोडणी बाबत नवीन आदेश दिले आहेत.
पंढरपुरातील मंदिरे पाडण्याच्या निर्णयामुळे, भाजपच्याच जेष्ठ नेत्याने केले नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप
कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या राज्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रलंबित कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्या येत्या मार्च २०२३ पर्यंत देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिले. यामध्ये १ लाख ५ हजार कृषि पंपाचा समावेश आहे. कार्यवाही करावी, असे निर्देश संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी या वेळी दिले.
Sai Pallavi: ‘या’ चित्रपटाच्या माध्यमातून साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण
प्रकाशभवन, पुणे येथे झालेल्या बैठकीत संजय ताकसांडे बोलत होते. विविध योजनांसह क्षेत्रीय कार्यालयांना निधीदेखील उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नवीन वीजजोडण्या देण्यात कोणतीही अडचण नाही, असे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे अशावेळी कृषिपंपांना सुरळीत वीजपुरवठा देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी सज्ज राहावे. अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्या आहेत. याशिवाय नादुरुस्त व जळालेले कृषी रोहित्र देखील बदलण्यात यावे असे ताकसांडे म्हणाले आहेत.
ब्रेकिंग! पोलीस बंदोबस्त असून चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने ११ पोलीस कर्मचारी निलंबित