मोफत रेशनबाबतचा नवीन नियम देशभर लागू! सरकारने सुरू केली ‘ही’ सुविधा

New rule regarding free ration applicable across the country! Government started this facility

रेशनकार्ड धारकांना सरकारकडून स्वस्त किंमतीत अन्नधान्य दिले जाते. यामुळे देशातील लाखो कुटुंबे आपले पोट भरत आहेत. रेशनकार्डच्या बाबतीत एक नवीन सुविधा सुरू केली आहे. याचा फायदा देशातील सर्वच रेशनकार्ड धारकांना होणार आहे. देशभरातील रेशनकार्ड धारकांना मोफत रेशन देण्याच्या सुविधेसोबत केंद्रसरकारने पोर्टेबल रेशनकार्डची (Portable Ration Card) सुविधा देण्याचा विचार केला आहे. देशातील काही राज्यांमध्ये ही सुविधा सुरू झाली असून उर्वरित राज्यात लवकरच सुरू होणार आहे.

जागतिक दूध उत्पादनात भारताचा 23 टक्के वाटा

पोर्टेबल रेशन कार्डमुळे तुम्हाला देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात रेशनकार्डची सुविधा मिळणार आहे. यासाठी तुम्हाला प्रत्येक ठिकणी वेगळे रेशनकार्ड तयार करण्याची गरज भासणार नाही. याशिवाय रेशनकार्ड धारकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे केंद्रसरकारकडून डिसेंबर पर्यंत मोफत रेशनची सुविधा देत आहे. या महिन्यात लाभार्थ्यांना दोनदा रेशन वाटप करण्यात येणार आहे.

बिग ब्रेकिंग! राज्यात प्लास्टिकवरील कडक बंदी हटवली

त्याच झालंय अस की, डिसेंबरमध्ये पहिल्यांदा रेशनचे वितरण निश्चित किंमतीवर केले जाणार आहे. तर दुसऱ्यांदा गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत वाटप करण्यात येणार आहे. याचा फायदा देशातील बहुतांश रेशनकार्ड धारकांना होणार आहे. याशिवाय मोफत रेशन पुरवठ्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सरकार टेक होम रेशन (Take Home Ration) प्रणाली ऑनलाइन करण्याचा विचार करत आहे.

“शिवरायांचा अपमान करण्याऱ्या राज्यपाल कोश्यारींना टकमक टोकावरून फेकून द्यावं”

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *