Rain Update । राज्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने (Rain) दडी मारली आहे. लावलेली पिके जगवायची कशी हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न एकीकडे गंभीर होत चालला आहे तर दुसरीकडे खरीप हंगामाची पिके पावसाअभावी जळण्याच्या मार्गावर आली आहेत. (Rain in Maharashtra) 20 ते 25 दिवसापासून पावसाने खंड दिल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. (Latest Marathi News)
Ajit Pawar । बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी, बायको म्हणते, “जरा दमानं घ्या..”
अशातच दूबार पेरणीची वेळ देखील आता निघून गेली आहे. त्यामुळे आता जरी नव्याने पेरणी करण्याची वेळ आली तरी पैसे कोठून आणायचे अशी समस्या शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. शेतीसाठी दमदार पावसाची गरज आहे. परंतु सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने पाऊस आणखी लांबणीवर पडला आहे. अशातच आता हवामान खात्याकडून (IMD) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (IMD Alert)
Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का; माजी आमदाराने केला शिंदे गटामध्ये प्रवेश
सप्टेंबर महिन्यात होणार पावसाचे आगमन
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या सात दिवसांत हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्याही याच प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु याचा कसलाच फायदा पिकांना होत नाही. पावसाअभावी धरणातील पाणीपातळी देखील खूप कमी होऊ लागली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवू शकते. तसेच सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर संपूर्ण राज्यात दमदार पाऊस पडू शकतो.
Crop Insurance । पावसाअभावी पिकाचे मोठे नुकसान! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई
दरम्यान, गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. यंदाच्या वर्षी मात्र राज्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने लावलेली पिके जगवण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. जर लवकरात लवकर पाऊस पडला नाही तर भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते.
Accident News । महामार्गावर भीषण अपघात! गाडीचा टायर फुटून घडला मोठा अनर्थ