Site icon e लोकहित | Marathi News

बातमी कामाची! ‘या’ प्रगत टोमॅटोच्या जाती ठरतील फायदेशीर

News work! 'These' advanced tomato varieties will be beneficial

टोमॅटो ही आहारात प्रामुख्याने वापरली जाणारी फळभाजी आहे. तसेच टोमॅटो पासून अनेक प्रकारची उत्पादने तयार केली जातात. यामुळे टोमॅटोला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. म्हणून शेतकरी कमी-जास्त क्षेत्रात टोमॅटोची (Tomato) लागवड करतात. यातून त्यांना जास्त नफा देखील मिळतो. दरम्यान कमी वेळात अधिक उत्पादन (Production) देणाऱ्या काही वाणांबद्दल जाणून घेऊया या लेखात.

ब्रेकिंग! भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज पृथ्वी शॉ च्या गाडीवर हल्ला

1) अर्का स्पेशल
अर्का स्पेशल या टोमॅटोची उत्पादन क्षमता 750-800 क्विंटल प्रति हेक्टर इतकी आहे. हा टोमॅटो प्युरी, पेस्ट, केचप, सॉस, टोमॅटो क्रश यासाठी प्रामुख्याने वापरला जातो.

2) अर्का अपेक्षा
अर्का अपेक्षा या टोमॅटोची उत्पादन क्षमता 800-900 क्विंटल प्रति हॅक्टर आहे. प्युरी, पेस्ट, केचप, सॉस, टोमॅटो क्रशसाठी या टोमॅटोला बाजारात मागणी असते.

3) अर्का अभेद
अर्का अभेद टोमॅटोचे उत्पादन सर्व हंगामात घेता येते. टोमॅटोचा रोग प्रतिकारक वाण म्हणून याची ओळख आहे. लागवडीनंतर 140 ते 150 दिवसांत याचे 70 ते 75 टन प्रति हेक्टर उत्पादन निघते.

आत्ताची सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला

4) अर्का मेघाली
अर्का मेघाली या टोमॅटोच्या वाणाची फळे मध्यम आकाराची असतात. ही फळे पिकल्यावर गडद लाल रंगाची दिसतात. हे वाण पावसावर आधारित शेतीमध्ये घेता येते. याची उत्पादन क्षमता 125 दिवसांत 18 टन प्रति हेक्टर एवढी आहे.

5) अर्का आलोक
अर्का आलोक या टोमॅटोच्या वाणाची फळे गोलाकार आणि मोठी असतात. याचे वजन 125 ग्रॅम इतके असते. लागवडीनंतर 130 दिवसांत हे टोमॅटो काढणीसाठी तयार होते. त्यामुळे या जातीची उत्पादन क्षमता 46 टन प्रति हेक्टर आहे.

राखी सावंतने केला मोठा धक्कादायक खुलासा; म्हणाली, “आदिल ड्रग्ज घ्यायचा आणि…”

Spread the love
Exit mobile version