Maharashtra Politics । सासवड : राज्यात लवकरच निवडणुका (Loksabha Election) पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अगोदर शिवसेना (Shivsena) आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) फूट पडली. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून बारामतीतून (Baramati) कोणाला तिकीट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (,Latest Marathi News)
Tiger Memon Photo । मोठी बातमी! ३० वर्षांनी मिळाला टायगर मेमनचा फोटो, पत्त्याचा देखील केला दावा
अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची ‘काँग्रेसमुक्त भारत’ ही घोषणा आहे. ही घोषणा सर्वत्र पोहचवून भाजप शहरासह, गाव, वस्ती, वाडीपर्यंत पोहचवण्याचे काम सर्वांना करायचे आहे. बारामतीचा आगामी खासदार हा भाजपचाच असणार आहे, असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील (Ankita Patil) यांनी व्यक्त केला आहे. सासवड येथे अजित नागरी पतसंस्था कार्यालयात भाजप युवा मोर्चा पुरंदर यांच्या वतीने आयोजित बैठकीत पाटील बोलत होत्या.
Kangana Ranaut । बॉलिवूडची ‘पंगाक्वीन’ करणार राजकारणात एंट्री, वडिलांनी केला मोठा खुलासा
या वेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार, प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी कुणाल टिळक, प्रदेश सदस्य अनिकेत हरकुडे, प्रदेश सचिव रौनक शेट्टी, जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर, पुणे युवा मोर्चाचे सरचिटणीस अजिंक्य टेकवडे, पुणे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष साकेत जगताप, जिल्हा चिटणीस विठ्ठल जगताप, विधानसभा प्रमुख मयूर फडतरे, तालुकाध्यक्ष संतोष जगताप, उपाध्यक्ष भानुकाका जगताप यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.
Crime News । खळबळजनक! जावयानं संपवलं सासरचं संपूर्ण कुटुंब, धक्कादायक आलं कारण समोर